जागतिकीकरण आणि उद्योगांचे बदलते स्वरूप पाहता तरुणाईचा एकंदर ओढा उद्योगशील झाला आहे. कैंपस प्लेसमेंटमध्ये मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या सोडून मुलं आपला स्वत:चा स्टार्ट अप सुरू करताना दिसत आहेत.
अशा नवीन उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून उद्योग यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे उद्योजकतेचे तंत्र व कौशल्य तरुणाईला समजेल आणि भावेल अशा रंजक व सोप्या शैलीत या पुस्तकाद्वारे समजावून सांगितले आहेत. त्यामुळे उद्योगशीलतेची ओढ आणखी वाढेल आणि रोजगार निर्माण करणारे तरुण मोठ्या प्रमाणात तयार होतील.
हे पुस्तक कोणासाठी?
• स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांसाठी
• आपला उद्योग यशस्वी, विकसित करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी
• गृहलक्ष्मीसह उद्योगलक्ष्मी होऊ इच्छिणाऱ्या गृहिणींसाठी
• नोकरी सांभाळून अर्धवेळ उद्योग करू इच्छिणाऱ्या नोकरदारांसाठी
• मोकळ्या वेळेत छोटा-मोठा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या ज्येष्ठांसाठी
• कौशल्यविकास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
• उत्तम प्रशासन करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापक, प्रशासकांसाठी
• उगवती पिढी रोजगारक्षम करू इच्छिणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांसाठी
• कल्पक निर्णय घेऊ इच्छिणाऱ्या नेतृत्वासाठी
• थोडक्यात सर्वांना हे पुस्तक मित्रासारखे मदत करेल.
• उद्योग सुरू करताना आणि वाढवताना उद्योगाच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते. रोजच्या व्यावसायिक जीवनातील नेमके मार्गदर्शन येथे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे.
तरुणाईला आकर्षक वाटेल अशा भाषेत लिहिलेले हे पुस्तक त्यांच्या उद्योगाप्रति निष्ठा वाढविण्यास मदत करेल आणि यशाचे दरवाजे उघडण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करेल. म्हणजे मग आत्मविश्वासाने प्रत्येक जण जगाला सांगू शकेल- ‘मी यशस्वी उद्योजक होणारच!’
मी यशस्वी उद्योजक होणारच (Mi Yashasvi Udyojak Honarach)
नवीन उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून उद्योग यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे उद्योजकतेचे तंत्र व कौशल्य तरुणाईला समजेल आणि भावेल अशा रंजक व सोप्या शैलीत या पुस्तकाद्वारे समजावून सांगितले आहेत. त्यामुळे उद्योगशीलतेची ओढ आणखी वाढेल आणि रोजगार निर्माण करणारे तरुण मोठ्या प्रमाणात तयार होतील.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹199.00Current price is: ₹199.00.
Add to cart
Buy Now
Categories: उद्योग, कायदा, व्यवस्थापन
Tags: saket prakashan, जीवन मुळे (Jeevan Muley)
Be the first to review “मी यशस्वी उद्योजक होणारच (Mi Yashasvi Udyojak Honarach)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.