स्मरणशक्ती म्हणजे एकदा शिकलेल्या बाबी परत स्मरण करण्याची पात्रता बाळगून असणे. विद्यार्थी, ऑफिसर्स किंवा गृहिणी असोत, सर्वांनाच उत्तम स्मरणशक्तीची गरज असते. उत्तम स्मरणशक्ती हीच यशाचा पाया असते. स्मरणशक्ती कमी असणे ही अगदी सर्वसाधारण बाब असल्यामुळे त्याबद्दल वैषम्य बाळगण्याचे काहीच कारण नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. आपली स्मरणशक्ती आपल्या बुद्धीवर अवलंबून नसते, तर आपण मेंदूचा वापर कशाप्रकारे करतो, यावर अवलंबून असते. काही साध स्मृतिवर्धक उपाय करून हे सहज शक्य आहे. काही गोष्टी कशा प्रकारे स्मरणात ठेवाव्यात, याचे आपल्याला योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळत नाही; म्हणून आपल्यातील बहुसंख्य लोक संघर्ष करीत असतात. ही पोकळी भरून काढण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. आपली स्मरणशक्ती विकसित करण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि परिणामकारक ठरतील अशा काही अफलातून तंत्राचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. कुटुंबातील सर्वांसाठीच उपयुक्त ठरणाऱ्या या पुस्तकाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. या तंत्राचा वापर करून कुणीही यशस्वी होऊ शकतो.
Reviews
There are no reviews yet.