Description
1955 नंतरचा अफगाणिस्तान. संधिसाधू अफगाण्यांनी रशियाला आत घेतलं. रशियाला हुसकावण्यासाठी अमेरिका अफगाणिस्तानात घुसलीच. दोन महासत्तांचा जोरदार सामना अफगाणिस्तानच्या भूमीवर सुरू झाला.यातून उदय झाला हिंस्र तालिबानींचा. या धुमश्चक्रीत होरपळली अफगाणिस्तानची जनता. अगदी दारुण ससेहोलपट झाली अफगाण स्त्रियांची. या बलाढय षडयंत्राविरुध्द उभी राहिली विशीतली तरुणी – ‘मीना’! तिनं या बलाढय सत्तांविरुध्द जागृतीचं भूमीगत कार्य उभारलं. तिच्या भोवती जमल्या नवरा-बाप-भाऊ-मुलगा गमावलेल्या अनेक स्त्रिया. तिनं उभी केली संघटना. पण तिसाव्या वर्षी ‘मीना’चा दुर्दैवी अंत झाला. तिची ही चरित्रगाथा _ जिवाला चटका लावणारी!
Reviews
There are no reviews yet.