Skip to content Skip to footer
Sale!

Mati Pankh Aani Aakash (माती पंख आणि आकाश)

Author: Dnyaneshwar Mule

205.00

कोणत्याही रुपात देशसेवेच स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकानं अवश्य वाचावं असं, ‘माती, पंख आणि आकाश’ !

Additional information

Weight 270 g
ISBN

9789386118080

Number of pages

225

Publisher

मनोविकास प्रकाशन (Manovikas Prakashan)

SKU: 9789386118080 Categories: , , Tags: , , , , , , , , , , Product ID: 19646

Description

महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातीलं लाट नावाचं गाव ! या गावातल्या सामान्य कुटुंबातला एक मुलगा आपल्या गावच्या मातीला साक्षी ठेवून चालू लागतो. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव. जनाबाई, मुक्ताबाई या संतांचे विचारधन आणि मुलभूत सामाजिक परिवर्तन घडवणारे फुले, आगरकर, शाहू महाराज, आंबेडकर आदींची दृष्टी त्याचे सगे सोबती बनतात.
आकाशाला गवसणी घालण्यासाठी चिकाटी आणि परिश्रम यांचे पंख घेऊन झेप घेणारा हा ध्येयवेडा कविमनाचा तरुण स्वसामर्थ्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवतो आणि संवेदनशील मन आणि सूक्ष निरीक्षणदृष्टी ठेवून देशसेवेत रममाण होतो. जगभर देशाचं प्रतिनिधित्व समर्थपणे करणारा हा उच्चपदावरचा अधिकारी मानवतेचं, पर्यावरणाच आणि सामाजिकतेच भान सोडत नाही. ‘विश्वची माझे घर’ हे त्याच्या जगण्यात प्रतिबिंबित झालेलं दिसतं.
नवनवी आव्हानं स्वीकारत वेगळी माणस, प्रदेश, निसर्ग आणि ज्ञान यांच्याकडे हा माणूस खेचला जातो. ‘जीवनातला एकमेक आनंद म्हणजे आपला रस्ता आपण ओळखणं आणि त्य रस्त्यावरून मनाची, बुद्धीची आणि विचारांची मशागत करत प्रत्येक संघर्षाला विधायक रूप देत पुढे पुढे जाणं’ अस म्हणणाऱ्या या जिप्सीचा, म्हणजेच भारतीय विदेश सेवेत काम करणाऱ्या ज्ञानेश्वर मुळे यांचा उत्कंठावर्धक प्रवास ‘माती, पंख आणि आकाश’ उलगडून दाखवतं.
कोणत्याही रुपात देशसेवेच स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकानं अवश्य वाचावं असं, ‘माती, पंख आणि आकाश’ !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mati Pankh Aani Aakash (माती पंख आणि आकाश)”

Your email address will not be published. Required fields are marked *