मराठी विषयाची भीती बाळगण्याचे कारण नाही. तुम्ही या पुस्तकाच्या मदतीने मराठीवर प्रभुत्व मिळवू शकाल. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना त्याचा पाया पक्का असावा लागतो. भाषेचा पाया म्हणजे त्या भाषेचे व्याकरण होय. भाषेच्या नियमांचे स्पष्टीकरण करण्याचे शास्त्र म्हणजे व्याकरण. मराठी भाषा आपण रोज वापरत असलो तरी मराठीचे व्याकरण मात्र बऱ्याच जणांना किचकट वाटते. त्यामुळे मराठीत जास्त गुण मिळवणेही अनेकांना अवघड जाते. या पुस्तकाचे मनापासून अध्ययन केल्यास व्याकरणाची भीती जाऊन तुम्ही मराठीत उत्तम गुण मिळवू शकाल.
ठळक वैशिष्ट्ये:
१) इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.
२) सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यावश्यक पायाभूत अभ्यास.
३) इयत्ता ५ वी ते १० वीसाठी अत्यावश्यक अशा सर्व महत्त्वाच्या घटकांचा समावेश.
४) आवश्यक तिथे सोडविलेली उदाहरणे.
५) व्याकरणाच्या अवघड नियमांची उकल.
Reviews
There are no reviews yet.