Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Manat (मनात)

Author: Achyut Godbole

370.00

पाश्चात्य ज्ञानशाखांची ओळख मराठीत करून देण्याच्या अच्युतच्या प्रचंड प्रकल्पातील है नवे पुस्तक ‘मनात’ चे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या मधल्या पाचशे-सहाशे पानांतून घरबसल्या ‘मेंदू आणि मानस’ या विश्वाची विमानयात्रा घडेल. याहून स्वस्त एअरलाइन उपलब्ध नाही.

Additional information

Weight 700 g
ISBN

9789391629755

Number of pages

601

Year of Publishing

2023

SKU: 9789391629755 Category: Tags: , , , , , Product ID: 19738

Description

पाश्चात्य ज्ञानशाखांची ओळख मराठीत करून देण्याच्या अच्युतच्या प्रचंड प्रकल्पातील हे नवे पुस्तक. ’मनात’चे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या मधल्या पाचशे – सहाशे पानांतून घरबसल्या मेंदू आणि मानस या विश्वाची विमानयात्रा घडेल. याहून स्वस्त एअरलाईन उपलब्ध नाही. – डॉ. अभय बंग असंख्य वाचकांना मंत्रमुग्ध करून सोडेल अशी मानसशास्त्राची रंजक कहाणी सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, विद्यार्थी, शिक्षक अशा सर्वांना प्रचंड उपयुक्त ठरेल. – डॉ. प्रकाश आमटे ’मनात’ – व्यापक अर्थानं माहिती देणारं अच्युतचं हे पुस्तक म्हणजे कुतूहल असणार्‍या प्रत्येक वाचकासाठी भरभरून असा खजिनाच आहे. – डॉ. रवी बापट व्यापक, अभ्यासपूर्ण, विषयाची संपूर्ण ओळख करून देणारं, अतिशय पायाभूत माहिती असलेलं मानसशास्त्रावरचं अच्युतचं हे नव पुस्तक ’मनात’ फॅसिनेटिंग आहे. – डॉ मोहन आगाशे ’मनात’ मराठीत तर सोडाच पण भारतात लिहिल्या गेलेल्या मानसशास्त्राच्या कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही इतका विस्तृत तपशील लालित्यपूर्ण शैलीतून मांडला आहे. – प्रा. एम. एन. पलसाने श्री. अच्युत गोडबोले यांचा ’मनात’ हा ग्रंथराज म्हणजे चौकस वाचकांना मानसशास्त्राच्या प्रमुख अंगाचा परिचय करून देणारे बौध्दिक खाद्य ठरु शकेल – प्रा. डॉ. भरत देसाई देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून ज्याप्रमाणे अमृत बाहेर काढलं त्याचप्रमाणे वैचारिक मंथन करून मानसशास्त्रासारखा कठीण विषयसुध्दा श्री. गोडबोले यांनी अत्यंत सोप्या शब्दात वाचकासमोर मांडला आहे . यामागे त्यांचं प्रदीर्घ वाचन आणि तपश्चर्या निश्चितच दिसून येते ! – डॉ. सुधाकर देशपांडे इंग्रजीमध्ये विल ड्युरान्तच्या ’स्टोरी ऑफ फिलॉसॉफी’ या पुस्तकाचे जे अढळ स्थान आहे ते ’मनात’ या पुस्तकाला मराठीत मिळणार आहे हे निश्चित ! – डॉ. आनंद नाडकर्णी ’मनात’ या पुस्तकातला प्रत्येक शब्द विषयाचं मर्म उलगडून सांगत वाचकांशी सहज दोस्ती करणारा आहे. केवळ अच्युतच ते लिहू जाणे…! – डॉ. राजेंद्र बर्वे मानसशास्त्रावरचं ’मनात’ हे अच्युतनं लिहिलेलं पुस्तक वाचलं आणि त्यांच्या उत्तुंग आणि अचाट प्रतिभेची प्रचिती आली. हे पुस्तक नक्कीच एक इतिहास घडवणार यात शंकाच नाही! – डॉ. प्रदीप पाटकर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Manat (मनात)”

Your email address will not be published. Required fields are marked *