‘मुले आजकाल ऐकतच नाहीत’, ‘तिथे गेले ना की, अंगावर काटाच येतो’, ‘त्याला पाहिले की, तिडीक उठते मस्तकात’ अशा नकारात्मक विचारांनी, शंकांनी ग्रासले आहात का?
मनात एक असते आणि तुम्ही भलतेच वागता का? इतरांवर विसंबून राहण्याइतके तुम्ही दुबळे आहात का? इतरांवर अकारण राग बरसतो, त्यांना दुखावता आणि स्वत:देखील दु:खी होता का?
उमजत असूनही चुकीचे पाऊल उचलता का?
माझी स्मृती म्हणजे नक्की काय?
स्मृती, विचार व त्याचबरोबर उलगडत जाणार्या भावनांचा परस्परसंबंध काय आहे?
अशा अनेक शंका, प्रश्न, विचार या सर्वांचे यथार्थ, व्यवहार्य आणि शास्त्रीय स्पष्टीकरण, त्याचबरोबर स्वत:ला बदलण्याचा साधा, सोपा आणि सहज मार्ग पुस्तकात मांडलेला आहे.
हे पुस्तक वाचकाला नैराश्य व ताणतणावावर मात करायला शिकवते, तसेच मन:शांती, आरोग्य,
आदर्श पालकत्व, सुखी वैवाहिक जीवन आणि
सशक्त नातेसंबंध जोपासण्यासाठी मार्गदर्शक ठरते.
वाचकाला स्वत:च्या स्वभावात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आणि तनामनाच्या आरोग्यासाठी
हे लेखन उत्तम टॉनिक ठरेल.
डॉ. जयंत बरिदे
Are you weighed down by negative thoughts and doubts? Do you often think, “Kids these days just don’t listen,” or “That place gives me chills,” or “I can’t stand the sight of that person”? Do you find yourself acting differently from what you truly feel? Are you overly dependent on others, prone to unnecessary anger, and end up hurting them—and yourself? Despite knowing what’s right, do you still take the wrong steps?
This book offers scientific, practical, and easy-to-follow explanations to help you deal with such emotional challenges. It examines the connection between memory, thoughts, and emotions, teaching you how to understand your feelings and take control of your reactions.
Reviews
There are no reviews yet.