Description
अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अधर्या जगात मारलेली गरुडभरारी! जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही. त्याला व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून, जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली. ’चलो दिल्ली’ची त्याची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एक नाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली नाहीत असा- महानायक! देशोद्शींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्तऎवजांचा, नव्या संशोधित कागदपत्रांचा वेध घेऊन व त्या व ’रणवाटा’वरून भ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचित जीवनकहाणी.
Reviews
There are no reviews yet.