Description
अडीच हजार वर्षापूर्वी या भूतलावर एक महापुरूष जन्मला. प्रज्ञा अन परिश्रम यांच्या संगमातून त्याने सम्यक ज्ञानाची प्राप्ती केली. अखिल विश्वासाठी तो वंदनीय झाला. सिध्दार्थ गौतमाचा बुध्द बनला. मानवी आयुष्यातील दु:खाचा परिहार करण्यासाठी बुध्दाने आर्यसत्ये, अष्टांगमार्ग, प्रतीत्यसमुत्पाद यांच्या आधारे धम्मतत्त्वांचा प्रसार केला. ज्ञान, करूणा, दया, अहिंसा, शांती यांचा संदेश देणारा दीप प्रत्येकाने अंतर्मनात लावावा, ही शिकवण सार्या मानवजातीसाठी सांगितली. आज अडीच हजार वर्षानंतरही बुध्दविचारांचा नंदादीप तेजाने तेवतोच आहे.
Reviews
There are no reviews yet.