Description
आणीबाणी असो की रमेश किणी,पुष्पाबाई लढण्यासाठी हिमतीने मैदानात उतरल्या.नाटकाच्या सेन्सॉरविरोधात बोलायच असो की शिवसैनिकांच्या गुंडगिरीविरोधात,त्या आवाज न चढवता, पण ठामपणे बोलत राहिल्या. पदवीचा मरठीचा अभ्यासक्रम पातळ होऊ नये, यासाठी जिवापाड प्रयत्न करत राहिल्या,तशाच त्या स्त्री अभ्यासाच पध्दतीशास्त्र मांडत स्त्रियांच्या प्रश्नाला एक सामाजिक आयाम देत राहिल्या.जितक्या आवेशाने त्यांनी लढे दिले,तितक्याच अलवारपणे वेगवेगळ्या संदर्भांतले तिढे सोडवले. आपल्या सगळ्यांना जाणवणारा पुष्पा भावे यांचा हाच युनिकनेस आणि त्यामागची कारण; त्या देत असलेला दृष्टिकोन आणि त्यामागचे विचार तत्त्व; वेगवेगळ्या लढ्यांना बाईंनी दिलेली साथ आणि त्यामागची त्यांची हिंमत या सार्यातल जास्तीत जास्त वाचकांसमोर याव,याकरिता हा प्रयत्न.
Reviews
There are no reviews yet.