Description
ही काही कपोलकल्पित कथा नाही, काल्पनिक कहाणी नाही. ही आहे एक खरीखुरी गोष्ट. एक डॉक्टर, तिला झालेला ब्लडकॅन्सर अन् तिनं जिद्दीनं त्याच्याशी दिलेला लढाएखाद्याला कर्करोग झाल्याचे निदान झाल्यास त्या व्यक्तीची अवस्ता काय असेल? त्याचे कुटुंब या घटनेला कसे सामोरे जात असेल? कर्करोग म्हणजे मृत्यूची गाठच, असे समजले जाते. डॉक्टर असलेल्या व्यक्तींनाही या रोगाने गाठले आहे. त्यातील एक डॉ. गीता वडपन. पतीपत्नी डॉक्टर असून त्यांचा व्यवसाय, पाच जणांचे कुटुंब असा सुखी संसार. सुखाच्या पायघड्या घातलेल्या असताना डॉ. गीता यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले.सामान्य माणसांप्रमाणेच त्याही हादरल्या. पती, मुले व पूर्ण कुटुंबीय व डॉक्टरांनी त्यांना आधार दिला, मनोबल वाढविले. त्यामुळे केमोथेरपीच्या अग्निदिव्यातून बाहेर पडून त्यांनी कर्करोगाची लढाई जिकली. त्या काळातील अनुभव त्यांनी ‘लढले अन् जिंकले मी…’ यात दिले आहेत. कर्करुग्ण व अन्य वाचकांनाही ते प्रेरणादायी आहेत.
Reviews
There are no reviews yet.