Description
पक्ष्यांच्या मऊसूत हलक्या पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते?मधमाशामकरंदावर अशी कोणती प्रक्रिया करतात,ज्यातून हजारो वर्ष टिकू शकणारा मध तयार होतो?कुण्या एका कीटकाची अंडी वीस-वीस वर्षं सुप्तावस्थेत कशी काय राहू शकतात?माणसाला अजूनही नजमलेलं सेलुलोजचं विघटन बुरशी कसं क्रते?आश्र्चर्यंच आश्र्चर्य!आपल्या शरीराचंही तेच.मेंदूपासून हृदयापर्यंत्च्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात,हे एक कोडंच.या आणि अशा प्रश्र्नांची कोडी अनिल अवचट यांना पडली आणि लागले की ते त्यांच्यामागे.तज्ञगाठले,पुस्तकं पालथी तली आणि ही कोडी सहज सोप्या भाषेत उलगमाणसाचा जन्म हे एक मोठे कुतूहल आहे. जन्मानंतरही अनेक गोष्टींबद्दल प्रश्न उभे राहतात. त्याबद्दल आश्चर्य वाटत राहते. लेखक, कलावंत अनिल अवचट यांनाही कित्येक गोष्टींबद्दल मनात प्रश्न निर्माण होतात. त्याचे उत्तर शोधण्याच्या ध्यासातून त्यांना खूप वेगळी, अद्भुत माहिती हाती येते. हीच माहिती त्यांनी ‘कुतूहलापोटी’मधून वाचकांना सांगितली आहे.साधारणपणे विषारी समजली जाणारी बुरशी परोपकारी कशी ठरते, याचे वर्णन करताना बुरशीचा इतिहास, भूगोलासह अत्यंत रंजक माहिती दिली आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, सापडणारा बॅक्टेरियाचा मागोवाही त्यांनी ‘बॅक्टेरियाचे इन्फेक्शन’ झाल्यासारखा घेतला आहे. कीटकविश्व, सापांची दुनिया, पक्षांच्या राज्यातील गमतीजमती उलगडून दाखविताना मधमाश्यांचे सहकार जीवनाचेही वर्णन केले आहे.जगातील आश्चर्यांपेक्षा आपल्या शरीरातील एकसे एक आश्चर्य कोणती आहेत, त्यांचे कार्य, रक्षणकर्ते रक्त, पोटाच्या पोकळीत शांतपणे काम करणारी स्वादुपिंड उर्फ पाँक्रिआसची वैशिष्ट्येसांगताना भयावह कर्करोगाचे गणितही समजावून दिले आहे. शेवटी मनुष्याच्या जन्मरहस्याच्या कुतुहलापोटी त्यांनी निसर्गाच्या या आविष्काराचा शोध घेतला आहे. विश्वातील रहस्यांची ही माहिती वाचून थक्क व्हायला होते.डून आपल्या समोर ठेवली.
Reviews
There are no reviews yet.