Description
समोर एखादे ध्येय असेल आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची दुर्दम्य इच्छा असेल, तर साधेसुधे जगणारा सामान्य माणूसही असामान्य कामगिरी करू शकतो, हे अभिमन्यू सूर्यवंशी यांनी या पुस्तकातून दाखवून दिले आहे.ही एक सत्यकथा आहे. गोपाळ मोरे या सर्वसामान्य चौथी उत्तीर्ण शेतकऱ्याची ही गाथा आहे, आपण राहात असलेला दुष्काळी भाग पाण्याने भिजावा, हे स्वप्न मोरे यांनी पहिले आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले.आमदारापासून ते पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्यासाठी जीवाचे रान केले. या कहाणीला सुरुवात १९६९ पासून होते.मोरे यांच्या या प्रयत्नांना केळझर धरणाच्या रूपाने यश आले. हे धरण ‘गोपाळसागर’ या नावाने ओळखले जाते. त्याचीच ही रोमांचकारी कहाणी.एक साधासा माणूस कोणत्याही पाठींब्याशिवाय केवळ चिकाटी ,दुर्दम्य इच्छाशक्ती ,खडतर तपश्च्रर्या आणि अपार कष्ट यांच्या जोरावर आपल्या तालुक्यासाठी धरण कसे मिळवतो त्यची ही प्रेरणादायी कथा…
Reviews
There are no reviews yet.