Description
या कहाण्या आहेत बड्या शहरातल्या पॉश सोसायट्यांमध्ये राहणार्या ,फाइव्ह स्टार हॉटेलांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मीटिंगा करणार्या, एनजीओ कल्चरमध्ये राहून सामाजिक काम करणार्या माणसांच्या.लेखक, समीक्षक गणेश मतकरी यांच्या १० कथांचा हा संग्रह. अर्ध्या खिडक्यांमधून डोकावणाऱ्या जगाचे हे दर्शन. हे विश्व आजच्या काळाचे आहे. नवे, आधुनिक जग अनुभवणाऱ्या आणि त्या जगाचे सर्व टक्के टोणपे खाणाऱ्या बदलत्या मध्यमवर्गीय माणसांचे हे दर्शन आहे.या सगळ्या कथा शहरी भागात घडतात. मोठी शहरे, चकचकीत वातावरणात त्या घडतात. पैसा, प्रसिद्धी, सत्ता या गोष्टी मिळवताना खरेखुरे जगणे, माणूसपण विसरतेय का, याचा शोध त्यांतून घेतला जातो; तसेच सामाजिक काम करण्याची इच्छा असणाऱ्या महत्वाकांक्षी माणसांचे जगणेही त्यातून समजते.मतकरी यांची भाषाही कथावस्तूशी साधर्म्य दाखवणारी आहे. त्यामुळे आजचा काळ, या काळाचे प्रश्न अधिक ठळक होतात.
Reviews
There are no reviews yet.