Description
प्रस्तुत पुस्तक हे एका अर्थाने महाराष्ट्रातील कार्यरत मंडळींना केलेला सलाम आहे. शहरी-ग्रामीण अशा दोन्ही विभागांतील आणि पाणी-जमीन-पर्यावरण-शेती-आरोग्य-शिक्षण-ग्रामविकास-आर्थिक सक्षमीकरण-अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक क्षेत्रांत ज्यांनी महत्त्वाचं आणि पथदर्शक काम उभं केलं आहे, त्यांना केलेला हा सलाम आहे. आजच्या आणि उद्याच्या महाराष्ट्रासाठी या प्रयोग-प्रयत्नांचं मोल मोठं आहे. या पुस्तकातील काही कामं महाराष्ट्राला माहित असली तरी काही कामं अशीच आहेत, जी माहित असायला हवीत. त्याप्रकारचे प्रयत्न महाराष्ट्रात गावोगावी व्हायला हवी.समाजाच्या भल्यासाठी धडपडणा-या ख-याखु-या आयडॉल्सना संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर शेती-पाणी-शिक्षण-आरोग्-र्पावरण-ग्रामविकास-विज्ञान-तंत्रज्ञान आदि क्षेत्रात पथदर्शक कार्य उभारणा-या आणखी काही कार्यरतांची ओळख करून देणारं पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.