Description
अत्रे, पु.ल., पुरंदरे, भोसले, आणि शेवाळकर हे मराठी वक्तृत्वाचे मानदंड ! ही सारी वक्तृत्वशिखरेच पण एक शिखर दुसर्यासारखे नाही हे या शिखरांचे वैशिष्ट. प्रत्येकाची वक्तृत्वशैली निराळी, विचारप्रतिपादनाची रीत निराळी, आपल्या शब्द श्रीमंतीतून माय मराठीला ऎश्वर्य प्रदान करण्याचा बाज निराळा आणि हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा वशीकरण मंत्रही वेगळाच या वाणीच्या उपासकांनी वाग्देवतेच्या गाभार्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले रसिक अन चोखंदळ श्रोत्यांनीही आपल्या हृद्यसिंहासनावर त्यांना दिले अढळपद
Reviews
There are no reviews yet.