Description
भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर विकास, प्रगतीची स्वप्ने काही अंशी साकार झाली असली तरी अध्याप असा एक भारत आहे कि
जेथे तळापासून सुरुवात करणे गरजेचे आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, यांची कास धरली तरी अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यातही आपले
लोकशाही सरकार अपयशस्वी ठरत आहे. अशावेळी अनेक संस्था, यांनी वेगवेगळ्या पातळींवर लोकांसाठी काम सुरु केले, त्यामुळे अनेकांना आयुष्यात
आशेचा प्रकाश दिसला.राजेंद्रसिंह यांचं ‘तरुण भारत संघ’, इला भाट यांची ‘सेवा’, वर्गीस कुरियन यांचे ‘अमूल’,मजदूर किसान संघ, लिज्जत.
हमाल पंचायत बाएफ या संस्था तसेच टाटा, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपन्या, ‘द हिंदू’ सारखे वृत्तपत्र यांचे समाजातील कार्य
‘खरीखुरी टीम इंडिया’ मधून वाचकांसमोर ठेवेले आहे.सशक्त, महान भारत घडविण्याच्या उद्धेशाने सुरु असलेले त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. यांचे संपादक सुहास कुलकर्णी आहेत.खरीखुरी टीम इंडिया ध्येय महान भारताचं हीच अब्जावधी भारतीयांची प्रेरणा, हीच जागवणार आहे कोटी-कोटी मनांमध्ये चेतना! मी आहे अब्जावधी भारतीयांमधला एक,मी प्रेरित झालो आहे या ध्येयाच्या चैतन्यस्पर्शाने ! ध्येय प्रेरित आत्म्याइतकी सशक्त ताकद दुसरी कुठलीच नाही या पृथ्वीतलावर! मी तेवत ठेवीन ज्ञानाचा दिवा प्रगत भारताच्या ध्येयपूर्तीसाठी…. मला विश्वास आहे, ध्येयाने भारलेल्या आमच्या मनांमधून; आमच्या कष्ट आणि घामामधून सशक्त, प्रगत आणि संजीव भारत घडणार आहे!अशा अनेक संस्था,संघटना,चळवळी ,प्रयोग,उपक्रम दिसू लागले ,जे लोकांना हरतर्हेने काम करत आहेत आणि लोकांना सर्वार्थाने समृद्ध करत आहेत.असे प्रयत्न करणार्या संस्था,संघटना,व्यक्तीच प्रगत भारताची खरीखुरी टीम आहे.
Reviews
There are no reviews yet.