Description
मुळात ब्रिटिशांनी बनविलेली आणि स्वातंत्र्यानंतर कल्याणकरी रूप धारण केलेली पोलादी नोकरशाही तिच्या स्टील फ्रेममध्ये घुसणारा एक ग्रामीण तरूण तिथल्या प्रवेशावेळची घुसमट , त्यातलं व्द्वद आणि कमान हाती घेतली कि सुरु होणारं भन्नाट जीवन शारीरिक , मानसिक व आध्यात्मिक अंगांची जाणीवपूर्वक केलेली मशागत आणि त्यातून रोज नव्याने घडणारा ‘विश्वास’ .
मुळात क्षमतांचा विकास व न्यूनगंडाचा खात्मा करून आत्मविश्वासाचं बीज पेरणारा हा प्रवास…. असाध्य वाटणारी स्वप्नं घेऊन मार्गस्थ झालेल्या माझ्या भावंडांना हा प्रवास अंतर्मुख करेल, स्फूर्ती देईल. आयुष्यातल्या कडव्या आव्हानांना झुंजण्यासाठी स्वत:ला रचनात्मक सवयी जडवण्यासाठी प्रोत्साहित करेल.
‘मन में है विश्वास ‘ या आत्मकथनामध्ये मी सुरुवातीचा संघर्षाचा कालखंड मांडला आहे . माझी आय. पी. एस. मधील निवड हा त्यातील सर्वोच्च बिंदू आहे . आता निवड झाल्यानंतर कुंभार मातीला आकार देतो तसे एका युवकाचे एका अधिकाऱ्यामध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे.
Reviews
There are no reviews yet.