Description
इतरांची आत्मसंतुष्टता आणि अल्पसंतुष्टता लेखकाला भेटू शकत नाही. इतरांसारखे मन:स्वास्थ्य त्याच्या वाटयाला असत नाही. अज्ञानात सुख असेल तर लेखक बहुतेक आयुष्य दु:खात आणि तापात काढतो. प्रिया ही दु:खे शोधत जाते. तिचे आतापर्यंतचे छोटे आयुष्य म्हणजेच दु:खांच्या शोधातला एक प्रयोग किंवा अनेक प्रयोगांची मालिका आहे. शब्द देता येतात. लिहिण्याची हौसही देता येईल. शैली तर दिली घेतली जातच असते. परंतु जगण्याचा आशय देता येत नाही. हा आशय ज्याच्या त्याने कमवावा लागतो, तो मिळविण्याची ईर्षा मुळातच असावी लागते.
Reviews
There are no reviews yet.