Description
जगाच्या पाठीवर हे कै. सुधीर फडके तथा बाबूजी यांनी लिहिलेलं आत्मचरित्र संपूर्ण नाही, अर्धदेखील नाही. त्यांच्या आयुष्याच्या अगदी प्रारंभी लहरी नियतीनं त्यांना जी वणवण भटकंती करायला भाग पाडलं. त्या भंडावून सोडणा-या प्रवासाचा फक्त एका भल्यामोठया टप्प्यापर्यंतचा हा वृत्तांत आहे.सुप्रसिद्ध संगीतकार कै. सुधीर फडके तथा बाबूजी यांचे हे अपुरे आत्मचरित्र म्हणजे वणवण भटकणार्या आणि कंगाल अवस्थेतही संगीतसाधना करीत राहिलेल्या एका कलंदर कलावंताचे विलक्षण पारदर्शी आत्मकथन आहे. उत्तरायुष्यात त्यांना मिळालेल्या प्रचंड यशामागे दडलेले त्यांचे अपयश आणि त्यावर मात करणारी त्यांची जिद्द याचे प्रभावी दर्शन घडवणारे हे पुस्तकसुद्धा लोकप्रियतेचे उच्चांक प्रस्थापित करणारे ठरले आहे.ललिता फडके यांनी सांगितलेल्या हृद्य आठवणींच्या आणि असंख्य दुर्मीळ छायाचित्रांच्या समावेशामुळे पुस्तकाच्या मौलिकतेत अधिक भर पडली आहे.
Reviews
There are no reviews yet.