मी माझे नैराश्याचे अनुभव स्वत:च्या वेदनेचे समर्थन करण्यासाठी सांगत नाही. माझी वेदना खरी आहे. ती माझ्याकडे माझ्या जीवनशैलीमुळे येत नाही किंवा ती माझ्या जीवनशैलीमुळे दूरही होत नाही.
आलिया भट्टची थोरल्यी बहीण, ‘स्क्रीनरायटर’ व प्रसिद्ध कुटुंबातील शाहीनने अतिशय धाडसाने तिची कहाणी मांडली आहे.
वयाच्या अठराव्या वर्षी तिला नैराश्याने ग्रासले असल्याचे निदान झाले. त्याआधी पाच वर्षांपासून ती या नैराश्याचा सामना करत होती… भावनांनी ओथंबलेल्या या पुस्तकात तिने तिचे दैनंदिन अनुभव तर सांगितले आहेतच; परंतु एकविसाव्या शतकात या मानसिक आजाराबद्दल किती गैरसमज व ग्रह आहेत यावरही प्रकाश टाकला आहे. तिने अत्यंत प्रामाणिकपणे हे अनुभव कथन केले आहे.
तिचे हे अनुभवकथन सर्वांनाच विचार करायला लावणारे आहे आणि ज्यांना कुठला मानसिक विकार असेल, त्यांच्यासाठी आधाराचा हात देणारे व निराश क्षणी मनावर फुंकर घालणारे आहे.
Reviews
There are no reviews yet.