Skip to content Skip to footer
Sale!

Its Always Possible (इटस ऑलवेज पॉसिबल)

Author: Kiran BediAuthor: लीना सोहोनी

350.00

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढत सर्वांना बरोबर घेऊन किरण बेदींनी जे सुधारणा कार्य घडवून आणले आहे ते स्फूर्तीदायक ठरावे असेच आहे.
या पुस्तकाने किरण बेदींच्या कार्याचा त्यांच्या कार्यपद्धतीचा आलेखच वाचकांपुढे मांडला आहे. प्रत्येक नागरिकाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक.

Additional information

Weight 415 g
ISBN

9788177663532

Number of pages

410

Publisher

Mehta Publishing House

Year of Publishing

2011/08 – 1st/2000

SKU: 9788177663532 Categories: , Tags: , , , , , , , , , , Product ID: 19623

Description

..त्या कुणी सामान्य तुरुंगाधिकारी नव्हेत. ’डायरेक्टर जनरल ऑफ दिल्ली प्रिझन्स’ म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर केवळ सातच महिन्यांत त्यांनी या नरकसदृश संस्थेला माणसांनी राहण्यायोग्य बनवलं आहे. एके काळी मादक द्रव्यांचा अतिरिक्त वापर आणि कर्मचा-यांच्या भ्रष्टाचारानं बुजबुजलेल्या या तुरूंगाची स्थिती आता बरीच निवळली आहे. याचं कारण म्हणजे तुरूंगात रोज कैदयांसाठी जी तक्रारपेटी पिटिशन बॉक्स- फिरवली जाते, तिच्या व्दारे ते कैदी आपल्या तक्रारी निनावी सुद्धा नोंदवू शकतात. एखादया लाचखाऊ पहारेक-याचं नाव आता या तक्रारपेटीच्या माध्यमातून उघडकीस येऊ शकतं. मादक द्रव्यांचे चोरटे व्यवहार करणा-या कैदयांचं बिंग फुटू शकतं. कैदयांना मारहाण करणा-या वॉर्डरांची नावं उजेडात येऊ शकतात… ’द टाइम्स’, लंडन ’गुन्हेगारी’ या विषयाच्या तज्ज्ञांचं असं मत आहे, की सदोष दंडपद्धतीमुळं समाजात महाभयंकर नरपशू मोकाट सुटण्याची शक्यता असते. तिहार कारागॄहाच्या नव्या मुख्याधिकारी सुद्धा याच विचारसरणीचा पुरस्कार करणा-या आहेत. तुरूंगातील तणावपूर्ण परिस्थिती त्याचमुळं आता ब-याच अंशी निवळली आहे. त्यामागंसुद्धा त्यांचे व त्यांच्या सहका-यांचे एकजुटीचे प्रयत्न कारणीभूत आहेत. तिहाराच्या उंचउंच भिंतीआड अगदी अंतर्भागात राहणारे सर्वच्या सर्व कैदी आता नि:शस्त्र असतात. पूर्वी तुरुंगाच्या साम्राज्यात ज्या काही अमानुष कारवाया चाललेल्या असत, त्यांनाही नव्या मानवतवादी भूमिकेमुळं फार मोठया प्रमाणात आळा बसला आहे. – ’द हिंदुस्तान टाइम्स’ अतिरिक्त सुरक्षा-व्यबस्बद्दल प्रसिद्ध असणा-या या तुरूंगातील वातावरणात आणि रात्री बाहेर पडण्यास बंदी असणा-या एखादया महिला वसतिगॄहामधील वातावरण यांत फारसा फरक नाही. हळूहळू या तुरूंगाचं एखादया आश्रमात रूपांतर होत आहे किंवा एखादया मंदिरात. सारा आसमंत पखवाज-ढोलकाच्या आवाजानं दुमदुमतो. वॉर्डमधून भजनाचे मधुर स्वर उमटू लागतात. उण्यापु-या दोनशे सत्तर कैदी स्त्रिया आसनस् होऊन, डोक्यावर पदर घेऊन ईश्वराच्या प्रानेत तल्लीन होऊन गेलेल्या दिसतात… – ’इंडिया टुडे’ तिहार सेंट्रल जेल भारतातील सर्वांत कठोर कारागॄह म्हणून ओळखलं जातं. मादक द्रव्यं, टोळीयुद्ध, कर्मचा-यांचा भ्र्चार, पहारेक-यांची, तशी गुंड कैदयांची दादागिरी यांचा बुजबुजाट असलेला हा तुरूंग… परंतु अलीकडं मात्र रोज प्रात:काळी तुरूंगाची विस्तीर्ण पटांगणात झाडांच्या सावलीत, स्वच्छ-निर्मळ वातावरणात हजारो तुरूंगवासी तसेच, ध्यानधारणेसाठी जमलेले दिसतात. गेल्या पस्तीस प्रथमच तिहारमध्ये स्वयंसेवी गटांना प्रवेश मिळाला आहे. हे सेवाभावी लोक मार्गदर्शन, वर्ग, व्यवसाय-प्रशिण, कायदेविषयक सल्ला व अगदी करमणुकीचे कार्यक्रम इत्यादी गोष्टींचं आयोजन करतात. – ’असोसिएटेड प्रेस’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Its Always Possible (इटस ऑलवेज पॉसिबल)”

Your email address will not be published. Required fields are marked *