Description
आजची जागतिक प्रगती ही पूर्णत: औद्योगिक क्रांतीवर अवलंबऊन आहे अन ही औद्योगिक क्रांती आधुनिक नव्हे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या भक्कम पायावर वेगाने विकसित होताना दिसते आहे. ए.आय., इन्फोटेक, नॅनोटेक, बायोटेक, रोबोटिक्स, बिग डेटा, क्रिप्टोकरन्सी अशा एकापेक्षा एक गुंतागुंतीच्या संकल्पनांवर ह्या भविष्यकालिन आधुनिक तंत्रज्ञानाचा अन पर्यायाने औद्योगिक क्रांतीचा डोलारा उभा आहे. भविष्यकालिन विश्व हे जितके विलक्षण तितकेच अदभुत असणार आहे. हे सारे विषय समजायला तसे कठीण अन विलक्षण गुंतागुंतीचे. पण अशा क्लिष्ट विषयांना, संकल्पनांना सध्या, सोप्या व सरळ मातृभाषेत समजावून सांगण्याचे असिधारा व्रत डॉ. अच्युत गोडबोले ह्यांनी घेतले आहे. इंडस्ट्री ४.० हे पुस्तक ह्याच मालिकेतले औद्योगिक क्षेत्रात काही नवे करू पहाणाच्या जिद्दी, महत्त्वाकांशी तरुणांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नव्या औद्योगिक क्रांतीची तोंडओळख करून देणारे ‘इंडस्ट्री ४.०’ हे पुस्तक निश्चितच वाचनानंद प्रदान करणारे ठरेल. ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी डॉ. अच्युत गोडबोले ह्यांच्या लेखनाचा
फार मोठा वाटा आहे.
Reviews
There are no reviews yet.