इकिगाई हेच जपानमधील लोकांचं सकाळी उठण्यामागील प्रयोजन आहे.’
‘तणावहीन, आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनशैलीचा जपानी मूलमंत्र : इकिगाई.’
– द टाइम्स
हे प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान आजच्या काळासाठी अधिक समर्पक आणि पूरक ठरतं. या तत्त्वज्ञानामध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकायची क्षमता आहे- ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी व्हाल.
सुखी होण्याचे मूलभूत नियम समजून घ्या : कोणत्याही गोष्टीची सुरुवात छोट्या प्रमाणात करा…
तुमचं सामर्थ्य कशात आहे, तुमचं अंतर्मन काय सांगतंय ते बघा…
तुम्हाला अतिशय उत्कटपणे काय करावंसं वाटतं त्याचा शोध घ्या…
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा…
तुमच्यामधील इकिगाई ओळखण्यासाठी, तिचा शोध घेण्यासाठी या असाधारण पुस्तकातील केन मोगी यांचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरेल.
Reviews
There are no reviews yet.