Skip to content Skip to footer
Sale!

I Dare (आय डेअर)

Author: Kiran BediAuthor: TRANSLATOR - Supriya Vakil

320.00

’माझा आत्मसन्मान, न्यायबुद्धी आणि माझा विश्वास व मूल्ये यांनी माझ्या आत्मविकासामध्ये अडथळे निर्माण करणा-यांवर मात करण्याची प्रेरणा मला दिली. म्हणूनच मी कोणाच्याही बंधनात न राहण्याचा निर्णय घेतला.’ प्रेरक, अंतर्दॄष्टी देणारे आणि जागरुक करणारे कथन!

Additional information

Weight 380 g
ISBN

9788177663556

Number of pages

392

Publisher

Mehta Publishing House

Year of Publishing

2013/07 – 1st/1996

Description

भ्रष्टाचार आपल्याकडच्या कारभाराच्या रंध्रारंध्रात झिरपला आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा प्राशासकीय व कायदेविषयक यंत्रणा आणि पद्धती यांवरचा विश्वासच उडाला आहे. अशा परिस्थितीत देशाला गरज आहे ती; इथल्या तपास आणि कायदेविषयक यंत्रणेची आणि सुव्यवस्था राखणा-या यंत्रणांची कसून चौकशी होण्याची. त्यासाठी स्वतंत्र भ्रष्टाचाराविरोधी अधिकारपदाची गरज आहे, ज्या पदाला तपास व खटला चालवण्याचे कायदेशीर अधिकार असतील. या सुधारित आणि विस्तारित आवॄत्तीत, नोकरशहा आणि अधिकारी यांनीच पोलीस-यंत्रणेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या मार्गात अडथळे कसे निर्माण केले, याचे तपशीलवर कथन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. परंतु तसे न करता त्या व्यक्तींनी बेदी यांची पोलीस कमिशनरपदी नियुक्ती होऊ नये, यासाठी अडथळे निर्माण केले. या अडथळयांवर मात करत, ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बेदी यांनी, सत्तेचा गैरवापर करणा-यांसोबत काम न करण्याचे ठरवले. अशा लोकांसमोर मान तुकवायची नाही, असा त्यांनी निर्धार केला. पण खरेच या व्यक्तींनी विकासाच्या मार्गात अडथळे-अडचणी निर्माण करून, मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करून काय मिळवले? असे अनेक प्रश्न मागे उरतातच. किरण बेदी म्हणतात, ’माझा आत्मसन्मान, न्यायबुद्धी आणि माझा विश्वास व मूल्ये यांनी माझ्या आत्मविकासामध्ये अडथळे निर्माण करणा-यांवर मात करण्याची प्रेरणा मला दिली. म्हणूनच मी कोणाच्याही बंधनात न राहण्याचा निर्णय घेतला.’ प्रेरक, अंतर्दॄष्टी देणारे आणि जागरुक करणारे कथन!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “I Dare (आय डेअर)”

Your email address will not be published. Required fields are marked *