Description
होय व्यसनमुक्ती शक्य आहे! आपल्या समाजातील खूप मोठा वर्ग व्यसनांच्या विळख्यात अडकलाय. गुटका-तंबाखू, विडी-सिगारेट, दारू, गांजा-अफीम-हेरॉईन-गर्द अशा एक ना अनेक व्यसनांनी लाखो लोकांची आयुष्य विस्कटून टाकली आहेत. त्यांची कुटुंब होरपळत आहेत. व्यसनाधीन व्यकती, त्याची बायको-मुलं, आई-वडील, मित्र- नातेवाईक या साऱ्यांच्याच आयुष्याची त्यामुळे नासाडी होत आहे.व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडायचं तरी कसं, हाच प्रश्न त्यांना भेडसावतो आहे. व्यसनांविषयी, त्यावरील उपचाराविषयी व्यसनमुक्तीसाठी मदत करणाऱ्यांविषयी माहिती देणारं हे पुस्तक. स्वत: व्यसनाधीनतेचा अनुभव घेतलेल्या नी व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असलेल्या लेखकाने लिहिलेलं.व्यसनमुक्तीच्या संदर्भात आजवर लिहिल्या गेलेल्या अनेक पुस्तकांपेक्षा हे पुस्तक वेगळं आहे.लेखकाने व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये विविध पातळ्यांवर घेतलेल्या अनुभवाचे हे सार आहे.
Reviews
There are no reviews yet.