Description
वपु काळे ह्यांचे कादंबरीलेखन मोजकेच आहे. त्यातील ही त्यांची पहिलीच कादंबरी. जिच्याभोवती हे लेखन झाले आहे तिच्या तडक, ठाम निर्णयामुळे आणि तिच्या एकाकी झुंजीमुळे हे लेखन प्रथम जेव्हा वाचकांपुढे आले तेव्हांच त्याने वाचकांच्या मनाचा ठाव घेतला होता. लेखनातला तो ताजेपणा अजूनही टिकून आहे म्हणूनच जग वेगाने बदलत असले तरी हे लेखन अजूनही तितक्याच उत्कटतेने वाचावेसे वाटते आणि ते वाचकाला तितकेच अजूनही धरून ठेवते. बाबीचे निर्धाराने आल्या प्रसंगाला सामोरे जाणे आणि अखेर आपलाच दाम खोटा निघाल्याचे बघून घायाळ होणे – हे वाचकालाही तितकेच घायाळ करणारे आहे – वपुंच्या लेखनाचा हा एक वेगळाच पैलू आहे. त्याने वाचकाला स्तंभित केले आहे.
Reviews
There are no reviews yet.