Description
“चौदा वर्षांची अनुष्का मागचे वर्षभर लॉकडाऊन मध्ये राहिलेली आहे. आता ती सोमनहळ्ळीमध्ये राहणाऱ्या आपल्या आजी-आजोबांच्या भेटीला निघालेली आहे. गेल्या खेपेला सोमनहळ्ळीला तिनं पुरातन पायऱ्यांची विहीर शोधून काढली होती. या तिच्या ‘हरवलेल्या मंदिराचे रहस्य’ च्या आठवणी अजून ताज्या आहेत. अखेर एकदा घराच्या चार भिंतींमधून बाहेर पडायला मिळाल्यामुळे अनुष्का खूष आहे. पण लवकरच ती आणखी एक रहस्य शोधून काढणार आहे, हे तिला कुठे माहीत आहे? फक्त याखेपेला ती तिच्या स्वतःच्याच घराण्याच्या इतिहासातील एक हरवलेला दुवा शोधून काढणार आहे. या पुस्तकातून लेखिकेनं प्रश्न विचारण्याचं आणि यांची समर्पक उत्तरं मिळवण्याचं महत्त्व स्पष्ट करून सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशा चित्रांनी आणि थक्क करणाऱ्या दृश्यांनी नटलेल्या या पुस्तकातून भारतातील सुप्रसिद्ध कथालेखिका सुधा मूर्ती आपल्याला विशाल अशा तुंगभद्रा नदीच्या काठाकाठानं एका अविस्मरणीय प्रवासाला घेऊन जातात. “
Reviews
There are no reviews yet.