Skip to content Skip to footer
Sale!

Goshti Mansanchya (गोष्टी माणसांच्या)

Author: लीना सोहोनीAuthor: सुधा मूर्ती

130.00

या कथासंग्रहात त्यांच्या एका खट्याळ, खोडकर विद्यार्थ्याची, वाचकांचं मन गुंतवून टाकणारी कथा आहे… एक नवा व्यवसाय सुरू करण्याचं आपल्या पतीचं स्वप्न पार पाडण्यासाठी घरखर्चातून बाजूला काढून ठेवलेली गंगाजळी त्यांच्यापुढे आणून ठेवताना लेखिकेला आपल्या आईच्या उपदेशाची आठवण कशी होते, त्याची कहाणी आहे…
“मोठेपणी आपल्या खेड्यातील वाचनालयाला पुस्तकांची देणगी देऊन ते तू समृद्ध कर”, असं वचन आपल्या नातीकडून घेणार्‍या, लेखिकेच्या स्वत:च्याच आजोबांची गोष्टसुद्धा यात आहे.

Additional information

Weight 200 g
ISBN

9788177665000

Number of pages

176

Publisher

Mehta Publishing House

Year of Publishing

25 / 1st/2004

SKU: 9788177665000 Categories: , Tags: , , , , , , , , , Product ID: 19545

Description

तुमच्याच आजीनं तुमच्याजवळ बसून साक्षरतेचे धडे गिरवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तुम्ही काय कराल ? किंवा जर समजा, भारताच्या राष्ट्रपतींनी प्रवासात तुम्हाला बरोबर घेऊन जायचं ठरवलं तर… ? किंवा तुमच्या शिक्षकांनी तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त गुण तुम्हाला दिले असले, तर… ?
सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या, सत्यघटनांवर आधारित असलेल्या या हलक्याफुलक्या, रोचक आणि मनोरंजक कथांमधून या व अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला सापडतील. सुधा मूर्ती… प्राध्यापिका, समाजसेविका आणि त्याचबरोबर आपल्या आगळ्यावेगळ्या कथालेखनाच्या शैलीने वाचकांना मोहवून टाकणार्‍या लेखिका !
या कथासंग्रहात त्यांच्या एका खट्याळ, खोडकर विद्यार्थ्याची, वाचकांचं मन गुंतवून टाकणारी कथा आहे… एक नवा व्यवसाय सुरू करण्याचं आपल्या पतीचं स्वप्न पार पाडण्यासाठी घरखर्चातून बाजूला काढून ठेवलेली गंगाजळी त्यांच्यापुढे आणून ठेवताना लेखिकेला आपल्या आईच्या उपदेशाची आठवण कशी होते, त्याची कहाणी आहे…
“मोठेपणी आपल्या खेड्यातील वाचनालयाला पुस्तकांची देणगी देऊन ते तू समृद्ध कर”, असं वचन आपल्या नातीकडून घेणार्‍या, लेखिकेच्या स्वत:च्याच आजोबांची गोष्टसुद्धा यात आहे.
या गोष्टी हसवणार्‍या, खेळकर, ताज्या आणि टवटवीत आहेत. जी गोष्ट आपल्या तत्त्वांना पटली असेल आणि आत्म्याला भावली असेल तीच करण्याचं धाडस आणि आपली स्वप्ने आपणच पूर्णत्वाला नेण्याचं साहस कसं करावं, हे यातील प्रत्येक कथा आपल्याला शिकवते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Goshti Mansanchya (गोष्टी माणसांच्या)”

Your email address will not be published. Required fields are marked *