Skip to content Skip to footer
Sale!

Ghar Haravaleli Manas (घर हरवलेली माणसं)

Author: व. पु. काळे

160.00

मला निरनिराळ्या संसारांनी, माणसांनी कोडी घातली. कोडी सोडवायचा प्रयत्न केला. त्यांच्या कथा झाल्या. कोडी तशीच राहिली. पाटी कोरी करकरीत राहिली. शब्द निसटले. चरे राहिले. असाच एक चरा घेऊन माझा व जगाचा संबंध एक दिवशी तुटणार आहे याची खंत आहे, भीती पण आहे. – वपु

Additional information

Weight 120 g
ISBN

9788177664218

Number of pages

120

Publisher

Mehta Publishing House

Year of Publishing

2013/04 – 8th/1981

SKU: 9788177664218 Category: Tags: , , , , , , , , , Product ID: 19521

Description

समाजात वावरताना अनेक व्यक्ती भेटतात. प्रत्येक व्यक्तीचं स्वत:चं असं एक तत्त्वज्ञान असतं. जगण्याची पद्धत असते स्वत:चे नियम, मतप्रणाली असते. आपल्या मनानं स्विकारलेल्या मतांप्रमाणे माणसं वागत असतात नि मतं वंशपरंपरेनं, संस्कारानं, परिस्थितीनं अशा अनेक कारणानं तयार होतात. प्रत्येक व्यक्तीगणिक या मतांचे आविष्कार भिन्न भिन्न होत असतात. यालाच आपण व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणत असतो. सर्वसामान्य माणसांचे राग, लोभ, मत्सर, प्रेम, करुणा यांचे आविष्कारही सर्वसामान्य असतात. त्याला स्वतंत्र चेहरा नसतो. परंतु काही माणसं मात्र वेगळी दिसतात. त्यांची भावना विचार व्यक्त करण्याची पद्धतही सर्वांहून वेगळी असते. म्हणूनच आपण त्यांना विक्षिप्त म्हणतो.
या कथासंग्रहात अशाच आठ विक्षिप्त व्यक्तींच्या तर्‍हा रंगवल्या आहेत. नामशेष होण्याचा धोका असतानाही माघार न घेणार्‍या या व्यक्तींच्या कथा आपल्या मनात घर करतात. कारण मनाच्या कोणत्यातरी कोपर्‍यात आपल्यालाही केव्हांतरी असंच वागायची इच्छा असते. सार्‍या जगाला झिडकारण्याचं, ठोकरण्याचं धाडस या व्यक्तींमध्ये दिसते. अशा व्यक्तींच्या वपुंनी रेखाटलेल्या या आठ खुमासदार कथा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ghar Haravaleli Manas (घर हरवलेली माणसं)”

Your email address will not be published. Required fields are marked *