Description
‘‘स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का?’’ – नरहर कुरुंदकर सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी चालू आहे? त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावा तरी कोणता होता? गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी नियुक्त झालेला कपूर आयोग हा न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी होता काय? अहवालात आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे अधिकारबाह्य मतप्रदर्शन कसे केले? आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता काय? मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनावट कागदपत्रे कशी तयार केली होती? सावरकरांचे गांधीजी, काँग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते? शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता? गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही?
Reviews
There are no reviews yet.