Description
ईश्वरानं निर्माण केलेल्या आणि मानवानं काही अंशी घडवलेल्या या जगातल्या जगरहाटीच्या जडणघडणीचा निरपेक्षपणे रसग्रहण करणारा हा कथासंग्रह.यामध्ये मानवी नात्यांतले हरवलेले, शोधलेले, सापडलेले अनेक अर्थ, कंगोरे तर आहेतच. परंतु विषयांच्या कॅलिडोस्कोपिक विविधतेतून वैशाली परांजपे यांनी त्यांचा घेतलेला वेध अस्वस्थ करून सोडतो.विशेष म्हणजे, कळीचं फूल व्हावं, इतक्या सहजतेनं त्यांच्या कथा फुलत जातात आणि त्यातून वेगवेगळ्या नैसर्गिक रंगसंगतीचं, सुगंधाचं आणि वैचित्र्यांचही ताकदीनं दर्शन घडत जातं
Reviews
There are no reviews yet.