Description
१९४७ साली भारतात जसे स्वातंत्र्याचे वरदान लाभले, तसाच विभाजनाचा शापही मिळाला. त्या शापाची बोच कमी होती म्हणून की काय, नवोदित पाकिस्तानने जम्मूकाश्मीर बळकावण्याचा खुनशी डाव आखून भारताला सशस्त्र संघर्षात खेचले. त्या सीमावर्ती संस्थानाने अगतिक होऊन स्वसंरक्षणार्थ भारताकडे धाव घेतली. विलीनीकरणाची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भारताने आक्रमकांना मागे रेटण्यासाठी लष्करी मोहीम आरंभली. ती अंशतः यशस्वी झालेली असतानाच युध्बंदी करार झाला. ते युध्द थांबले, पण संघर्ष शमला नाही. तो जीवघेणा संघर्ष आजतागायत चालूच आहे
Reviews
There are no reviews yet.