Skip to content Skip to footer
Sale!

Dollar Bahu (डॉलर बहू)

Author: उमा कुलकर्णीAuthor: सुधा मूर्ती

175.00

`फार विचित्र आहे हा देश! ते एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथं नोकर्‍या आहेत, यंत्र-तंत्र आहे. सुख संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून तिथं जातात – पण माघारी यायला जमत नाही. तिथून जावं असा आपला देशही नाही. तिथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही.

Additional information

Weight 185 g
ISBN

9788177667455

Publisher

Mehta Publishing House

Year of Publishing

Edi 20/1st-2003

SKU: 9788177667455 Categories: , Tags: , , , , , , , , , , , , , , Product ID: 19522

Description

`फार विचित्र आहे हा देश! ते एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथं नोकर्‍या आहेत, यंत्र-तंत्र आहे. सुख संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून तिथं जातात – पण माघारी यायला जमत नाही. तिथून जावं असा आपला देशही नाही. तिथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही. तिथल्या जीवनाची तुम्हाला कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा. तिथं डॉलर मिळविण्यासाठी आम्ही आपली माणसं, घर-दार सगळं सोडून, तिथल्या थंडी-वार्‍याला तोंड देत राहतो, पण तिथल्या समाजाचं अविभाज्य अंग होऊ शकत नाही. फारच महाग पडतो हा डॉलर! पण हे भारतात कुणालाही समजत नाही. पैशाच्या दलदलीत सापडलोय आम्ही! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी मिळते तिथे. जाती, भाषा यांचं राजकारण नाही तिथे. सुखानं आपलं आपण काम करू शकतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आणखी दु:खी होईन.’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dollar Bahu (डॉलर बहू)”

Your email address will not be published. Required fields are marked *