Description
जन्म 31 मे 1725. मृत्यू 13 ऑगस्ट 1795. ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती.ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती.ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती.जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता,हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवन दायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रुप घेतले.तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरत खंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले.मात्र ती सर्वगुण संपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळया मर्यादा होत्या. अठराव्या शतकातल्या मराठयांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातल्या खेड्यात धनगर कुटुंबात जन्मलेली, वाढलेली मुलगी… ती मराठा साम्राज्याचा आधारस्तंभ झाली. तिचे चरित्र. ऐतिहासिक दस्तऐवजांच्या साक्षीने तिच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला वेध.
Reviews
There are no reviews yet.