Description
सामान्यांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अडचणींचे डोंगर पार करावे लागतात. पण यावर मात करीत एव्हरेस्ट चढण्याचे स्वप्न साकार करणे म्हणजे काय याचे वर्णन एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने ‘ध्यास उत्तुंग हिमशिखरांचा’मध्ये केले आहे.
सोलापूरच्या पठारी भागात राहणाऱ्या आनंदला एव्हरेस्ट सर करायचा होता. परिस्थिती बेताची असली, घरून विरोध असला तरी ध्येय उत्तुंग असल्याने ‘अॅडव्हेंचर वर्ल्ड’चे सुरेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनामुळे त्याने ‘बेसिक’ व ‘अॅडव्हान्स’ची तयारी केली.
सर्वाधिक उंचीचा एव्हरेस्ट सर करण्याआधी आर्थिक पाया बळकट करणे आवश्यक होते. प्रायोजकत्व मिळविताना कोणत्या अनुभवांना सामोरे जावे लागले. त्यासाठी केलेली अमेरिकेची वारी, आजारपण यावर मात करीत सागरने २०१२च्या मिशन एव्हरेस्ट मोहिमेवर गेला.
तेथेही अनेक संकटे, आजारपण, सहकारी रमेश यांचा मृत्यु यामुळे मानसिक ताण याला सामोरे जावे लागले. तरी स्वप्नाकडे धाव घेत त्याने १६ मे २०१२ रोजी अंतिम चढाई आणि २९,०२९ फूट उंचावरील एव्हरेस्ट शिखर सर केले. हा सर्व ‘स्वप्नातून ध्येयाकडे’ नेणारा खडतर प्रवास प्रेरणादायी आहे.
Reviews
There are no reviews yet.