Description
आत्मचरित्र हे थोरामोठ्यांचे असते हा समज दूर होऊन आता सामान्यांची आत्मचरित्रेही प्रसिद्ध होऊ लागली आहेत. त्याच महिलांची संख्या लक्षणीय आहे. अलका गोडे यांनी या क्षेत्रात पाऊल टाकले आणि ‘धाकट्या नजरेतून’ आकाराला आले. खरे तर अलकाताईंचे माहेर हे लेखन व्यवसायाशी संबंधित माजगावकर यांचे ‘राजहंस प्रकाशन’ यांचे. पण लेखनाचा संबंध या आत्मचरित्राच्यानिमित्त आला.माहेर, सासर; तसेच अगदी जवळच्या माणसांबद्दल त्यांनी यात लिहिले आहे. भाऊ श्री. ग. माजगावकर, दिलीप माजगावकर, बहीण निर्मलाताई पुरंदरे, मेहुणे बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी भरभरून लिहिले आहे; तसेच पती वासुदेव गोडे, मुले, दीर, सासू यांच्याविषयीची आत्मीयता, प्रेम, आदर आदी भावना लेखनातून व्यक्त झाल्या आहेत. सासर – माहेरला जोडणारे हे आत्मचरित्र वाचनीय झाले आहे
Reviews
There are no reviews yet.