Description
स्वप्नं पाहायला कुणी शिकवावं लागत नाही. तरुणाई स्वप्नाळू असतेच मुळी. पण स्वप्नं सहजासहजी साकार होत नाहीत. ती कठोर परीक्षा घेतात आणि कोणतीही दयामाया न दाखवता अनेकांना अपयशाचे रट्टे देतात. साहजिकच पदरी निराशा येते. पुढची वाट दिसेनाशी होते. काय करावं, कुठे जावं… काही कळत नाही. मार्गदर्शक मित्र भेटत नाही… अशा असंख्य तरुणांना थोरल्या भावाच्या नात्यानं धीर देणा-या, उठून उभं राहण्यासाठी हात देणा-या आणि स्वप्नं साकार करण्यासाठी नेमकी कोणती साधना कशी नि केव्हा करायची, हेही समजावून सांगणा-या एका तरुणाचं हे बावनकशी लखलखतं आत्मकथन…आजच्या तरुणांबद्धल बरंच काही बोललं जातं; पण एवढ मात्र खरं कि आजची तरुणपीढी धडपडत शिकणारी आणि शिकून नवा समाज घडवणारी आहे. या तरुणांनाआवश्यकता असते ती मदतीच्या हाताची, मार्गदर्शनाची आणि विश्वासाची. ही गरजपूर्ण करतं ते संदीपकुमार साळुंखे यांचं हे पुस्तक. अंमळनेर सारख्या छोट्याश्याशहरात राहणारे साळुंखे दहावीला बोर्डात आले.त्या मंतरलेल्या दिवसांची ते प्रथम आठवण काढतात. त्या यशातच पुढीलआयुष्याची मुहूर्तमेढ रोवलेली असते. एक रूपयाचं पहिलं बक्षीस, असं झालं माझंअक्षर वळणदार, पहिल्या क्रमांकाची वेठबिगारी, दिसली यशाची खुण, न्यूनगंडाचायक्षप्रश्न, इंग्रजीचा बागुलबुवा, अशा प्रकरणांतून दिसते ती धडपड, जिद्द आणिस्वत:ला ओळखण्याचा अट्टहास. ते सगळं मुळातून वाचण्याजोगंच.!
Reviews
There are no reviews yet.