Description
नाटकाचं चित्रीकरण केलं, की सिनेमा होऊ शकेल, असं वाटण्याच्या काळात त्यांनी मूव्ही कॅमेरा बनवला, बोलका मराठी चित्रपट बनवला, तो सातासमुद्रापार नेऊन गौरवला, महाराष्ट्र्राचा मानबिंदू उभा केला… ‘प्रभात फिल्म कंपनी’. ‘प्रभात’चे चित्रपट सर्वदूर माहीत आहेत,पण दामलेमामांचा चरित्रपट ? त्यातलीच ही काही सोनेरी पानं…ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी हे चरित्र लिहून या माणसाच्या अफाट कर्तृत्वाची गाथाच सांगितली आहे. ज्या काळात कामगाराचं कल्याण, त्यांच्यासाठी सुखसोयी, त्यांच्याकरता काही प्रकल्प राबवावेत अशा गोष्टींची चर्चाही नव्हती, त्या काळात दामलेमामांनी कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या, त्याचबरोबर कामगारांना शिस्तही लावली. चित्रपटसृष्टी ही बेभरवशाची आणि वेळ न पाळणारी असा लौकिक असलेली; पण प्रभात फिल्म कंपनीचं काम अगदी वेळेवर आणि ठरल्यानुसार होत असे. गोडबोले यांनी प्रचंड संदर्भ बघून अनेक पुस्तकांतील माहिती तपासून घेत हे चरित्र लिहिलं आहे. प्रभातच्या वाटचालीचा आणि ही कंपनी उभी करण्यासाठी दामले यांनी किती श्रम घेतले ते कळतं. दामलेमामा या कंपनीचे आणि मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील महानायकच होते. प्रभातनं काय काय केलं ते अनेक ठिकाणी आलं आहे; पण या चरित्रातून कंपनीच्या धोरणाची आणि त्यामागच्या प्रयत्नांची माहिती मिळते
Reviews
There are no reviews yet.