Description
याला वास्तव समजून जगभरात अभिजात भयकथा लिहिल्या गेल्या. काळ बदलला. भयाला भय न समजता त्याचा अज्ञानाशी संबंध लावून भयाची विरचना करण्याचा नवा काळ आला. सायकॉलॉजी आणि सायकियाट्रीच्या विकासानंतर भयाला मानवी मनाचे विभ्रम समजलं गेलं. या भयाचं विश्लेषण करणार्या आधुनिक लेखकांमध्ये गुप्ते यांचा समावेश होतो. त्यांच्या या पूर्वीच्या ‘अंधारवारी’ या भयकथा संग्रहातसुद्धा भयाच्या मानसिकतेची उलगड करण्याची आकांक्षा दिसून येते. रोमॅंटिसिझमच्या तत्त्वदर्शनानुसार भय ही अस्सल आणि करकरीत मानवी प्रेरणा आहे. भयाचा बाऊ न करता त्यातल्या सौंदर्यवादी घटकांची कदर करणार्या अनेक लेखकांना भयतत्त्वाने भुलवलं. जर्मन लेखक ई.टी.ए. हॉफमन किंवा अमेरिकन लेखक एडगर एअॅलन पो या तत्त्वदर्शनाचे एकोणिसाव्या शतकातले महान प्रवक्ते होते. ‘खरा चित्रकार कोण? हाती ब्रश घेतलेला माणूस की ज्या कॅनव्हासवर तो चित्र काढतो तो कॅनव्हास?’ असा गूढ प्रश्न विचारणारी हृषीकेश गुप्त्यांची ‘दैत्यालय’ ही कादंबरिका कॅनव्हासच्या गूढ रंगसंगतीवर रचली गेली आहे.
Reviews
There are no reviews yet.