Description
चित्रकार गोपाळ देऊसकर ही कहाणी आहे त्यांच्या चित्रनिर्मितीची. बालपणीच त्यांच्यातले चित्रगुण प्रकटले. उत्तरोत्तर ते बहरत गेले. या कलेच्या जोरावर ते इंग्लंडला जाऊन रॉयल ऍकॅडमीत शिकले. भारतीय संस्थानिकांच्या राजवाडयातून वावरले. पुण्याच्या ‘टिळक स्मारक मंदिरा’तील लोकमान्य टिळक जीवनदर्शन आणि ‘बालगंधर्व रंगमंदिरा’तील बालगंधर्व त्यांच्या कुंचल्यातून साकार झाले. त्यांच्या कॅनव्हासवर कोटयवधींचे दागिने ल्यालेली राणी उमटली, तशीच दूध विकणारी खेडूत स्त्रीही! अशी त्यांची कित्येक चित्रे! ही कहाणी आहे देऊसकरांच्या व्यक्तिगत जीवनाची.
Reviews
There are no reviews yet.