Description
चिपर बाय द डझन’ हे फ्रँक गिलब्रेथ या गृहस्थावर त्याच्या एका मुलीने व मुलाने लिहिलेले पुस्तक. चरित्रात्मक असूनही अत्यंत मनोवेधक व मनोरंजक आहे. फ्रँक गिलब्रेथ व्यवसायाने इंजिनिअर. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे कुशलतेने कशी करावी, यावर ते संशोधन करत व त्याचे प्रयोग आपल्या मुलांमुलींवर करत. त्यानी स्वत:ला जाणीवपूर्वक, ठरवून बारा मुले होऊ दिली. आपल्या मुलांना टंकलेखन, मॉर्सकोड, मोठमोठाल्या रकमांचे तोंडी गुणाकार, भागाकार त्यांनी स्वत:च्या पद्धतीने शिकवले. त्याचप्रमाणे फ्रेंच, जर्मन, भाषा, भूगोल, खगोलशास्त्र शिकवून प्रवीण केले होते. मुलांना जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून शिष्टाचार, रीतरिवाज, याबरोबरच मुलांच्या समित्या बनवून त्यांच्यावर वर्षभराची धान्यखरेदी, वस्त्रप्रावरणांची खरेदी, वगैरे कामे सोपवली होती. घरात कोणत्याही गोष्टीत उधळमाधळ व बेजबाबदारपणा होऊ नये म्हणून एक काटकसर समितीही होती. या समितीतली मुले घरभर हिंडून जरूर नसताना पंखे, दिवे, पाणी वाया जात नाही ना हे पहात व चूक करणार्यास दंडही करत. फ्रँक गिलब्रेथ यांच्या सर्व उपक्रमात मानसशास्त्राची पदवीधर असलेली त्यांची पत्नी लिली सहभागी असे.
जागतिक पॉवर परिषद व व्यवस्थापन परिषद (आंतरराष्ट्रीय) इंग्लंड व झेकोस्लोव्हाकियात भरणार होत्या. या दोन्ही परिषदात भाषण करण्यासाठी फ्रँक गिलब्रेथ यांना आमंत्रण होते. तिकडे जायला निघालेले असताना त्यांना, स्वत:च्या गावातच टेलिफोनवरून आपल्या पत्नीला काही सुचना देत असतांना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मृत्यू येतो. त्यानंतर घरच्या कौटुंबिक मंडळाची बैठक घेऊन लिली फ्रँक गिलब्रेथ, पतीच्या जागी आपण या दोन देशात भाषण देण्यास जाण्याचे ठरवते. तिच्या गैरहजेरीत सर्व मुले अगदी दोन वर्षाच्या मुलांपासून सर्व सांभाळण्याचे तिला आश्वासन देतात.
Reviews
There are no reviews yet.