Description
कर्तबगार सत्ताधारी स्त्री दुराग्रही आणि तिच्यात दडलेली आई आंधळी झाली, म्हणजे जन्माला येते लोकशाहीचा घास घेऊ पाहाणारी आणीबाणी. २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी या देशावर आणीबाणी लादली आणि घटनाबाह्य सत्ताकेंद्र म्हणून संजय गांधचे नेतृत्व उदयाला आले. याबद्दलची साधकबाधक चर्चा करणारी अनेक पुस्तके यापूर्वी प्रसिद्ध झाली आहेत. पण त्या अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असणार्या बी. एन. टंडन या पंतप्रधानांच्या कार्यालयातील संयुक्त सचिवाची ही तत्कालीन दैनंदिनी त्या सर्वांपेक्षा वेगळेपणाने उठून दिसणारी आहे.
Reviews
There are no reviews yet.