बुद्धिमान मुलं घडविण्याच्या अफलातून पद्धती (Buddhiman Mul Ghadvinyachya Aflatun Paddhati)

बुद्धिमान मुलं घडविण्याच्या अफलातून पद्धती (Buddhiman Mul Ghadvinyachya Aflatun Paddhati)

प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे – स्वत:चं मूल! या मुलावर चांगले संस्कार व्हावेत, त्यानं खूप मोठं व्हावं, हे प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं; पण प्रत्यक्षात मूल मोठं होण्याच्या प्रक्रियेत अनेक प्रश्न उद्भवतात, अडचणी येतात. मुलांचं वागणं आपल्याला समजत नाही आणि आपलं म्हणणं कसं समजावून सांगावं, हेही कळत नाही.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹199.00.

Placeholder

Original price was: ₹250.00.Current price is: ₹199.00.

Add to cart
Buy Now

प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे – स्वत:चं मूल! या मुलावर चांगले संस्कार व्हावेत, त्यानं खूप मोठं व्हावं, हे प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं; पण प्रत्यक्षात मूल मोठं होण्याच्या प्रक्रियेत अनेक प्रश्न उद्भवतात, अडचणी येतात. मुलांचं वागणं आपल्याला समजत नाही आणि आपलं म्हणणं कसं समजावून सांगावं, हेही कळत नाही.
‘वयोगट २ ते ७ हा मुलांच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त असा काळ आहे,’ असं सांगतानाच लेखक अनेक बाबींची उकल करतात. मुलांना शाळेत टाकण्यापूर्वी करण्याची तयारी, विविध विषयांचं ज्ञान मिळविण्याच्या त्यांच्या पद्धती, त्यांचं खेळणं, शारीरिक विकासासोबतच सामाजिक आणि भावनिक विकास याबाबतही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या पुस्तकात दिली आहे.
प्रस्तुत पुस्तकातील अत्यंत साधी-सोपी भाषा, वेगवेगळ्या सोळा मुद्द्यांवर दैनंदिन आयुष्यातील प्रसंगांधारे सांगितलेली शास्त्रीय माहिती या अत्यंत जमेच्या बाजू ठरतात. “मुलांमध्ये कल्पकता जोपासा, ज्ञानापेक्षा कल्पकता जास्त महत्त्वाची असते,’ अशा अनेक सूचनाही खूप महत्त्वाच्या आणि उपयुक्त आहेत.
पालक वर्गाने – विशेषत: पालकत्वाचा अनुभव प्रथमच घेणाऱ्या पालकांनी तर हे पुस्तक केवळ वाचूच नये तर त्यावर अंमलबजावणी करून ते संग्रहीदेखील ठेवावे.
– अंजली अ. धानोरकर
उपजिल्हाधिकारी
औरंगाबाद

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बुद्धिमान मुलं घडविण्याच्या अफलातून पद्धती (Buddhiman Mul Ghadvinyachya Aflatun Paddhati)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0