Description
माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद… आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित असणा-यांतले भेद… किती तऱ्हांनी विभागून डोकी ’भिन्न’ करतात. पण एका क्षणी आमचं हे वेगळेपणच आमची शक्ती, ऊर्जा, चेतना बनतं. आमच्या प्रत्येक तुकड्यात जीव ओतून एकसंध बनवतं. खरं आहे की, आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू लागतं; त्याच प्रमाणे मरणंही निरर्थक आहे, हे ही पाठोपाठ कळतं. मग आपल्या वाट्याला येणा-या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा, असं वाटतं. जगावं वाटतं. नुसतं जगावं नव्हे, तर चांगलं जगावं असं वाटतं. तेव्हा मात्र या शकलित बुध्दिच्या माणसांपेक्षा आम्ही खरोकरच सर्वार्थानं भिन्न बनतो…
माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद, आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित भेद…
अशावेळी ’एड्स’सारख्या शारीरिक रोगानं पीडित, समाजाच्या विखारी आरोपी नजरांच्या विळख्यात आणि कुटुंबाच्या गिलोटीन खाली जगण्याचा प्रयत्न करणार्यांचं काय होत असेल? हे सगळे मिळून किती तर्हांनी डोकी ’भिन्न’ करतात.
पण एका क्षणी अशांचं हे वेगळेपणच शक्ती, ऊर्जा, चेतना झालं तर?
आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू लागलेलं असतानाच मरणंही निरर्थक आहे, याची पाठोपाठ झालेली जाणीव!
अशावेळी आपल्या वाट्याला येणार्या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा असं वाटणार्या, जगावंसं वाटणार्या, चांगलं जगावंसं वाटणार्या ’एड्स’ ग्रस्तांची ही कहाणी.
माणसांना ’भिन्न’ करणार्या शकलित बुद्धीच्या माणसांपेक्षा या अशा प्रकारे ’भिन्न’ ठरलेल्यांची कहाणी-
Jenna Moore –
Best action book