Description
बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी अवघ्या दहा वर्षांच्या काळात दीडकशे कविता लिहिल्या. निसर्गाच, झाडांच, वाहत्या निर्झरांच, पक्ष्यांच, मानवी भावभावनांच आणि सृष्टीच्या सचेतन अचेतनाच विश्वरूप त्यांनी आपल्या कवितांमधून नव्या शब्दकळेने आणि जिवंत अनुभवाने अस मांडल, की अख्खा महाराष्ट्र त्या कवितेने वेडा झाला. नव चैतन्य देणारी, निस्सीम आनंद देणारी आणि निसर्गाच्या पायवाटेकडून म्रुत्यूच्या डोहाकडे घेऊन जाणारी ही कविता मराठी कवितेच्या इतिहासात फार महत्त्वाची अन मोलाची आहे.
Reviews
There are no reviews yet.