Description
साहित्य संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या पाच कथासंग्रहांमधील निवडक अशा वीस कथांचा हा संग्रह.
या वीसही कथांच्या केंद्रभागी भूक आहे, त्याचबरोबरच या मंडळींना “आपल्याला माणूस समजले जावे’ हीही भूक आहे. या माणसाचे प्रत्ययकारी चित्रण या कथांमधून आहे.
या कथांच्या निवडीचे व संपादनाचे काम राजन गवस यांनी केले आहे. या कथा समजून घेण्यासाठी गवस यांची प्रस्तावना आवर्जून वाचावी.
आपल्या देशात अनेक देश आहेत. नकाशात दिसतो तो तर देश आहेच; पण नकाशात न दिसणारा देशही आपल्या याच देशात आहे. गावात राहणारा देश आहे, गावकुसावर राहणारा देश आहे आणि दोन्हीही ठिकाणी स्थान नसणारा असा भटक्यांचाही देश आहे. प्रत्येक ठिकाणच जगण वेगळ आणि मरण वेगळ आहे. काही ठिकाणी जगण स्वस्त, तर मरण महाग आणि काही ठिकाणी मरण महाग, तर जगण स्वस्त आहे. काही जण काबाडकष्ट करून प्राणी जगवतात, तर काही जण मेलेल्या प्राण्याच्या तोंडातील घास खाऊन जगतात. काही जण मरणानंतर अतिशय सुंदर अशा स्नशानात पोहोचतात, तर काही जण प्रेतासाठी, त्याच्या दफनासाठी जागा शोधत फिरतात… अशाच काही कथा धक्कादायक कथा पण अव्यक्त माणसांच्या.
Reviews
There are no reviews yet.