Description
सतत सानिध्यात असूनही परके वाटणारे आपल्या शरीराचे अवयव या पुस्तकात स्वत: स्वत:ची माहिती करून देत आहेत अशी कल्पना करून अतिशय रंजकपणे ती मांडली आहे. आपल्या शरीरातील हे सगळे अवयव कोठे आहेत, ते कसे काम करतात, ताणतणावांचा त्यांच्यावर काय परिणाम होतो याची सखोल ओळख करून दिली आहेआरोग्यविषयक संवाद करणारे डॉ. यश वेलणकर यांचे हे पुस्तक. शरीराचे अवयव, त्यांचे कार्य, त्यांच्या गरजा आणि त्यांची दुखणी हे विषय सोप्या भाषेत समजावून सांगणारे असे पुस्तकच क्वचितच वाचायला मिळेल. हृदय, रक्तवाहिन्या, फुफ्फुस, मान व घसा, जठर, आतडे, यकृत प्लीहा,
स्वादुपिंड आदी अवयवांची स्वतंत्र प्रकरणे पुस्तकात समाविष्ठ केली आहेत.
डोळे, त्वचा, नाक, दात यांची शास्त्रीय माहिती होतेच,शिवाय जैविक मेंदू, भावनिक मेंदू, वैचारिक मेंदू असा स्वतंत्र विचारही डॉ. वेलणकर यांनी केला
आहे. शरीरातील घटकांचे प्रमाण कमी जास्त झाले, तर अवयवांवर त्याचे कोणते परिणाम होतात आणि एकूणच विकार व उपाययोजना यांची माहिती पुस्तकातून होते.
Reviews
There are no reviews yet.