Description
मराठी माणसे उद्योजक म्हणून पुढे येत नाहीत, असे म्हटले जाते. मात्र राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय बड्या उद्योगांमध्ये ‘मास्टर माईंड’ मराठी माणसांचे आहे, हे बहुतेकांना माहित नसते. टाटा, रिलायन्स, गोदरेज, मर्सिडीज, विल्ट, लॉर्ड इंडिया, रामोजी फिल्म सिटी अशा अनेक दिग्गज उद्योजकांच्या कोअर ग्रुपमध्ये मराठी माणसांचा समावेश आहे. टाटा इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर किशोर चौकर, रिलायन्सचे सिनिअर ग्रुप प्रेसिडेंट व्ही. व्ही. भट, एशियन पेंट्सचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक पटवर्धन अशा उच्च पदांवरील २० मराठी मंडळींची ओळख आनंद अवधानी यांनी ‘बिग बॉस’ मधून करून दिली आहे.अस्सल मराठी बिग बॉसेस असं या पुस्तकातल्या सर्वांचं समान वर्णन असलं तरी ही मंडळी आज रोजी मराठी आहेतही आणि नाहितही.
Reviews
There are no reviews yet.