Description
स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक मिशन-यांनी भारतात समाजकार्य केले, पण त्या धर्माचा प्रसार, धर्मांतराची किनार होती. पण तरी त्यातील काहींनी जे कार्य केले ते नजरेआड करता येत नाही. त्यापैकी एक विल्यम्स कॅरी. ते फक्त धर्मप्रसारासाठी भारतात आले नाही, तर त्यांनी ही भूमी आपलीशी केली. मराठी, बंगाली भाषेचे व्याकरण त्यांनी तयार केले.सांख्य तत्वज्ञान, रामायण व अनेक संस्कृत ग्रंथांचे भाषांतर केले. सती बंदी कायद्यासाठी पुढाकार घेतला. सर्वात महत्वाचे म्हणजे मातृभाषेतून शिक्षण देण्याचा आग्रह धरला. अश्या या इथल्या मातीत रमलेल्या ख्रिश्चन मिशन-याची ओळख डॉ. अरुण गद्रे यांनी ‘असे होते विल्यम्स कॅरी’ मध्ये करून दिली आहे. फारश्या परिचित नसलेल्या या कर्तुत्ववान व्यक्तीमत्वाची ही कहाणी भारतीयांना प्रेरणादायी आहे.
Reviews
There are no reviews yet.